स्टँड-अप कॉमेडियन समय रैना पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.
'इंडियाज गॉट लेटंट'च्या मोठ्या वादानंतर आणि काही महिन्यांच्या शांततेनंतर त्यानं आपल्या यूट्यूब चॅनेलवर 'Still Alive' नावाचा एक विशेष व्हिडीओ प्रदर्शित केलाय.
त्याच्या या व्हिडीओला २५ कोटींपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. सध्या समयची सगळीकडे चर्चा आहे.
तो आता केवळ भारतातच नव्हे, तर आंतरराष्ट्रीय स्तरावरही ओळख निर्माण करत आहे.
यातच समयच्या संपत्तीची चर्चा रंगली आहे. इकोनॉमिक टाईम्सच्या रिपोर्टनुसार त्याची एकूण संपत्ती अंदाजे २० ते २५ कोटी रुपयांच्या आसपास आहे.