आता 'ही' अभिनेत्री आहे १०१ कोटींची मालकीण
लोकप्रिय अभिनेत्रीने तिच्या शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी लहान वयातच काम करायला सुरुवात केली होती.
एकेकाळी हॉटेलममध्ये काम करणारी ही अभिनेत्री आज ती चित्रपटसृष्टीत सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक आहे.
ती अभिनेत्री आहे समांथा रुथ प्रभू. सामंथा रुथ प्रभूचं वैयक्तिक आयुष्य कायम चर्चेत राहिलं आहे.
एकेकाळी समांथा हॉटेलमध्ये आठ तासांच्या शिफ्टसाठी ५०० रुपये कमवत असे.
आज ती एका चित्रपटासाठी ३ ते ५ कोटी रुपये घेते. तिची एकूण संपत्ती १०१ कोटी रुपये असल्याचं सांगितलं जातं.
एका अभिनेत्री म्हणून केवळ सिनेमांपुरती मर्यादित न राहता, समांथाने वेब सिरीज आणि व्यवसायातही पाय रोवले आहेत.
अभिनयासोबत ब्रँड एंडोर्समेंट्स, जाहिराती, आणि तिचे स्वतःचे प्रॉडक्शन हाऊस यामुळे तिच्या उत्पन्नात सातत्याने वाढ होत आहे.
घटस्फोटापासून ते आजारापर्यंत, गेल्या काही वर्षांत ही अभिनेत्री चर्चेत आली आहे.
असं म्हटलं जातं की, तिनं सुमारे २५० कोटी रुपयांची पोटगी नाकारली, नाहीतरी तिच्या संपत्तीत लक्षणीय वाढ झाली असती.
समांथा ही आज फक्त एक अभिनेत्री नसून एक प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखली जाते