साऊथ अभिनेत्री समांथा रुथ प्रभू दुसऱ्यांदा लग्नबंधनात अडकली आहे.
समांथाने घटस्फोटानंतर चार वर्षांनी पुन्हा संसार थाटला आहे. अभिनेत्रीने लग्नाचे फोटो शेअर केले आहेत.
समांथाने मंदिरात पारंपरिक पद्धतीने राज निदिमोरु यांच्यासोबत लग्नगाठ बांधली.
लग्नासाठी समांथाने लाल रंगाची साडी आणि केसांत गजरा माळत पारंपरिक लूक केला होता.
समांथाचा दुसरा पती राज निदिमोरु हे एक प्रसिद्ध दिग्दर्शक आहेत. त्यांची 'द फॅमिली मॅन' सीरिज नुकतीच प्रदर्शित झाली आहे.
समांथाच्या 'सिटाडेल हनीबनी' या सीरिजचं दिग्दर्शनही त्यांनीच केलं होतं. या दरम्यानच ते प्रेमात पडले.
काही वर्ष डेट केल्यानंतर आता त्यांनी लग्नबंधनात अडकण्याचा निर्णय घेतला आहे.