'सैयारा'सिनेमाची सध्या क्रेझ आहे. पण या नावाचा अर्थ नक्की काय माहितीये का?
'सैयारा'हा सुंदर काव्यात्मक शब्द आहे. हा अरेबिक शब्द आहे ज्याचा अर्थ ग्रह किंवा तारा असा होता
विशेषत: या शब्दाचा वापर पृथ्वीवरचा फिरता ग्रह किंवा पृथ्वी या अर्थानेही केला जातो
'मै सैयारा हूँ, आसमां मेरा घर है'(मी एक फिरता ग्रह आहे, आकाशच माझं घर आहे.)
अत्याधुनिक अरबी भाषेत 'सैय्यारा' या शब्दाचा वापर 'कार/वाहन' या अर्थानेही केला जातो
साहित्यिक शब्दात तारा आणि अत्याधुनिक शब्दात वाहन असा त्याचा सोयीस्कररित्या वापर होतो
सैयारा सिनेमातही याचा अर्थ सांगितला आहे. ताऱ्यांमध्ये एक असा एकटा तारा जो स्वत: भस्म होऊन अख्ख्या जगाला प्रकाशमय करेल.