'सैयारा' सिनेमात अभिनेता अहान पांडे आणि अभिनेत्री अनीत पड्डा मुख्य भूमिकेत आहेत.
सध्या 'सैयारा' या बॉलिवूड सिनेमाची सर्वत्र चर्चा आहे. बॉक्स ऑफिसवर सिनेमाचा बोलबाला आहे.
४०-५० कोटींचं बजेट असलेल्या 'सैयारा'ने आत्तापर्यंत जवळपास १९० कोटींच्या घरात कमाई केली आहे.
सिनेमाचा दिग्दर्शक मोहित सुरीने 'सैयारा'साठी ७-८ कोटींचं मानधन घेतलं आहे.
तर अहान पांडे आणि अनीत पड्डा या सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं आहे.
यशराज फिल्म्सची निर्मिती असलेल्या या सिनेमासाठी दोघांनाही अंदाजे ३-५ कोटी इतकं मानधन मिळालं आहे.