मराठी कलाविश्वातील लोकप्रिय जोडी रुमानी खरे आणि स्तवन शिंदे यांनी लग्नगाठ बांधली आहे.
काही महिन्यांपूर्वीच स्तवन आणि रुमानी यांचा साखरपुडा झाला होता. ८ मार्च रोजी स्तवन आणि रुमानी यांचा विवाहसोहळा संपन्न झाला.
त्यांच्या लग्नसोहळ्यातील काही खास क्षणांचे फोटो समोर आले आहेत.
रुमानी ही लोकप्रिय गायक संदीप खरे यांची मुलगी असून एक अभिनेत्रीही आहे.
रुमानीने 'तू तेव्हा तशी' या मालिकेद्वारे अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं होतं. यानंतर रुमानी 'दुर्गा' मालिकेत झळकली.
स्तवन शिंदे स्टार प्रवाहच्या 'तुमचं आमचं सेम असतं', 'जय भवानी जय शिवाजी’ या मालिकांमध्ये झळकला होता.