मराठमोळी थोडीशी साधी भोळी

 अभिनेत्री रेश्मा शिंदेचं खास फोटोशूट

अभिनेत्री रेश्मा शिंदे सध्या तिच्या एका खास फोटोशूटमुळे सोशल मीडियावर चर्चेत आली आहे. 

आधुनिक लूक असो वा पारंपरिक, रेश्मा प्रत्येक पेहरावात प्रेक्षकांचे मन जिंकते. 

मात्र, यावेळी तिने 'मराठमोळी पैठणी' परिधान करून सर्वांच्या नजरा स्वतःकडे वळवून घेतल्या आहेत.

रेश्माने शेअर केलेल्या फोटोंमध्ये तिने सुंदर पैठणी परिधान केली आहे. 

रेश्माने हे फोटो शेअर करताच तिच्या चाहत्यांनी त्यावर कौतुकाचा वर्षाव सुरू केला आहे.

'रंग माझा वेगळा' या मालिकेतील 'दीपा' या भूमिकेने रेश्माला मोठी लोकप्रियता मिळवून दिली.

 सावळ्या रंगाच्या आव्हानात्मक भूमिकेतून तिने प्रेक्षकांच्या मनात घर केले. 

सध्या ती 'घरोघरी मातीच्या चुली' या मालिकेमध्ये काम करत असून सोशल मीडियाच्या माध्यमातून सतत चाहत्यांच्या संपर्कात असते.

Click Here