बॉलिवूडचा सुपरस्टार अजय देवगण हा बॉलिवूडचा असा अभिनेता आहे ज्याने पहिल्याच चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांचे मन जिंकले.
१९९१ मध्ये 'फूल और कांटे' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. बॉलिवूडमध्ये अजयचं नाव अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं आहे.
अजय व करिश्मा कपूरने अनेक सिनेमात एकत्र काम केले. एकमेकांसोबत काम करता करता हे दोघेही एकमेकांच्या जवळ आले होते.
रवीना टंडनसोबतही अजयचे नाव जोडले गेले. असे म्हणतात की, करिश्मा कपूरला डेट करत असतानाच अजयच्या आयुष्यात रवीनाची एंट्री झाली आणि अजयने करिश्माला सोडून रवीनाशी जवळीक वाढवली.
विशेष म्हणजे काजोलसोबत लग्न केल्यानंतरही अभिनेत्याच्या अफेअर्सची चर्चा रंगल्यात.
अजय आणि कंगना यांनी 'वन्स अपॉन अ टाइम इन मुंबई'मध्ये एकत्र काम केले आणि या काळात त्यांची जवळीक वाढली.
ही चर्चा काजोल हिच्यापर्यंत पोहोचल्यानंतर तिने 'मुलांना घेऊन घर सोडून जाईल' अशी धमकी दिली होती. त्यानंतर अजय याने कंगना हिच्यासोबत असलेलं नातं संपवलं. त्यानंतर कधीच दोघांनी एकत्र काम केलं नाही.
अजय आणि तब्बूची नावेही अनेक वेळा जोडली गेली आहेत. अनेक लोकांचा असा विश्वास आहे की अजय अजूनही तब्बूवर प्रेम करतो.
अभिनेत्री इलियाना डिक्रूज हिच्यासोबतही अजयच्या अफेअरच्या चर्चा रंगल्या होत्या. या बातम्यांमध्ये फार काही तथ्य नव्हते. पण चर्चा जोरात होत्या.