रकुल प्रीत सिंगचं 'बोल्ड' फोटोशूट!
बॉलिवूडच्या बोल्ड & ब्यूटिफुल अभिनेत्रींच्या यादीत आघाडीवर असलेल्या नावांपैकी एक म्हणजे रकुल प्रीत सिंग.
प्रत्येक वेळी आपल्या किलर लूकने चाहत्यांची मनं जिंकण्यात तिचा हातखंडा आहे.
आता सोशल मीडियावर तिच्या बोल्ड अदांनी चाहत्यांवर पुन्हा एकदा मोहिनी घातली आहे.
ताज्या फोटोशूटमध्ये रकुलने काळ्या रंगाचा बॉडीकॉन ड्रेस घालून काही हॉट फोटो इन्स्टाग्रावर शेअर केले आहेत.
हॉट अँड फिट फिगर फ्लाँट करत रकुलने या फोटोशूटमध्ये वेगवेगळ्या पोज दिल्या आहेत.
तिचा हा सुपरहॉट लूक चाहत्यांना खूपच आवडलाय.
रकुल प्रीत सिंगच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर, ती अलीकडेच 'दे दे प्यार दे २' मध्ये अजय देवगणच्या अपोझिट मुख्य भूमिकेत दिसली होती.
बॉलिवूडसह साउथ इंडस्ट्री गाजवणाऱ्या या अभिनेत्रीने 'यारियॉं' चित्रपटातून इंडस्ट्रीत पदार्पण केलं होतं.