माधवनने २००० मधील 'अलायपायुते' (तमिळ) आणि २००१ मधील 'रेहना है तेरे दिल में' (हिंदी) या चित्रपटांमुळे त्याला मोठी प्रसिद्धी मिळाली
भारतीय चित्रपटसृष्टीतील योगदानाबद्दल भारत सरकारने त्याला २०२६ मध्ये 'पद्मश्री' या चौथ्या सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित केले आहे.
'रॉकेट्री: द नँबी इफेक्ट' या चित्रपटाद्वारे त्याने दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण केले. या चित्रपटासाठी त्याला 'सर्वोत्कृष्ट वैशिष्ट्यपूर्ण चित्रपटा'चा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला.
सप्टेंबर २०२३ पासून माधवन पुण्याच्या 'भारतीय चित्रपट आणि दूरदर्शन संस्था' (FTII) या नामांकित संस्थेचा अध्यक्ष म्हणून कार्यरत आहे
आर. माधवनचं पूर्ण नाव रंगनाथन माधवन आहे. रंगनाथन न लावता त्याऐवजी तो आर. हेच सुरुवातीला जोडतो
अभिनयात येण्यापूर्वी माधवनला लष्करी सेवेत रस होता. त्याने एनसीसी (NCC) मध्ये उत्कृष्ट कामगिरी केली होती