फॅशन का जलवा! 

'देसी गर्ल'चे फोटो व्हायरल 

बॉलिवूड ते हॉलिवूडपर्यंत आपल्या अभिनयाचा डंका वाजवणारी अभिनेत्री म्हणजे प्रियंका चोप्रा.

प्रियंका सध्या तिच्या आगामी हॉलिवूड चित्रपट 'द ब्लफ'मुळे चर्चेत आहे. 

 सध्या या चित्रपटाचे प्रमोशन जोरात सुरू असून, प्रियंकाच्या लूकने चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.

प्रियंकाने नुकतेच तिच्या इंस्टाग्रामवर प्रेस टूरच्या पहिल्या दिवसाचे काही फोटो शेअर केले आहेत.

या फोटोंमध्ये प्रियंकाने तिच्या पात्राची झलक आपल्या फॅशनमधून देण्याचा प्रयत्न केला आहे.

 प्रियंकाने आकर्षक पांढरा ड्रेस परिधान केला आहे.

आपला लूक पूर्ण करण्यासाठी प्रियांकाने अगदी हलका मेकअप आणि कमीत कमी दागिन्यांचा वापर केला आहे.

 'द ब्लफ' हा चित्रपट येत्या २५ फेब्रुवारी २०२६ रोजी अ‍ॅमेझॉन प्राइम व्हिडीओ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे.

Click Here