'देसी गर्ल'चा जलवा! 

प्रियंका चोप्रावर खिळल्या सर्वांच्या नजरा

'ग्लोबल आयकॉन' प्रियंका चोप्रा हिने पुन्हा एकदा जागतिक स्तरावर भारताची मान उंचावली. 

ऑस्करसारख्या  जागतिक पुरस्कार सोहळ्यात अवॉर्ड प्रदान करणारी प्रियंका ही पहिली भारतीय अभिनेत्री ठरली. 

मुख्य सोहळ्यानंतर पार पडलेल्या प्रतिष्ठेच्या 'व्हॅनिटी फेअर ऑस्कर आफ्टर-पार्टी'मधील प्रियंकाचे काही ग्लॅमरस फोटो सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत.

प्रियंकाने इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या फोटोंमध्ये तिने स्टेला मॅककार्टनी यांनी डिझाइन केलेला सिल्व्हर मेटॅलिक गाऊन परिधान केला आहे.

हा बॅकलेस गाऊन प्रियंकाच्या फिट आणि ग्लॅमरस व्यक्तिमत्वाला अधिकच उठावदार बनवत होता.

 या लूकला अधिक 'रॉयल' टच देण्यासाठी तिने खांद्यावर कॅरॅमल-ब्राऊन रंगाचा 'फर बोआ' घेतला होता.

प्रियंकासोबत तिचा पती आणि पॉप स्टार निक जोनास देखील अत्यंत डॅशिंग दिसत होता. 

निकने बेज रंगाचा डबल-ब्रेस्टेड टक्सीडो परिधान केला होता. फोटोंमध्ये या दोघांची रोमँटिक केमिस्ट्री स्पष्टपणे जाणवत आहे.

Click Here