'देसी गर्ल'चा जलवा!


निक आणि प्रियंकाची 'परफेक्ट' केमिस्ट्री

जागतिक पातळीवर आपल्या फॅशन सेन्सने नेहमीच सर्वांना भारावून टाकणारी प्रियंका चोप्रा पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. 

'गोल्डन ग्लोब अवॉर्ड्स २०२६' च्या रेड कार्पेटवर प्रियंकाने आपल्या लूकने सर्वांच्या नजरा खिळवून ठेवल्या.

प्रियंका निळ्या गाऊनमध्ये एखाद्या राजकन्येसारखी भासत होती.  तिने आपला लूक अतिशय रॉयल ठेवला होता. 

या दिमाखदार सोहळ्यात प्रियांकाचा पती आणि प्रसिद्ध गायक निक जोनास देखील तिच्यासोबत होता.

 निकने क्लासिक स्ट्राइप्ड टक्सिडो परिधान केला होता. 

या दोघांची जोडी रेड कार्पेटवर अतिशय 'पॉवर कपल' म्हणून उठून दिसत होती.

प्रियांका आणि निकने २०१८ मध्ये मोठ्या थाटामाटात लग्न केले होते.

 दोघांनी आधी ख्रिश्चन पद्धतीने लग्न केले आणि नंतर हिंदू रितीरिवाजांनुसार सात फेरे घेतले.

Click Here