प्रिया बापटचा आज 'हॅप्पी बर्थ डे', किती वर्षांची झाली?

वाढत्या वयासोबत अधिकच सुंदर दिसतेय!

प्रिया बापट सध्या मराठीसह हिंदी मनोरंजनसृष्टी देखील गाजवताना दिसतेय. अभिनेत्री म्हणून प्रियाने स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. 

प्रियाने चित्रपट, नाटक, वेबसिरीज आणि टीव्ही मालिका या चारही क्षेत्रांत काम करून प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. 

प्रियाचा मनमोकळा स्वभाव आणि उत्तम अभिनय यामुळे ती चाहत्यांमध्ये खूप लोकप्रिय आहे. 

प्रियाचा मोठा चाहतावर्ग आहे. प्रेक्षकांच्या या लाडक्या अभिनेत्रीचा आज वाढदिवस आहे. 

१८ सप्टेंबरला प्रियाचा वाढदिवस असतो.

आज वाढदिवसानिमित्त प्रियावर चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. 

प्रियाचा जन्म मुंबईत झाला. तिची जन्मतारीख १८ सप्टेंबर १९८६ आहे. प्रिया सध्या ३९ वर्षांची आहे.

प्रियाचं सौंदर्य आणि तिचा फिटनेस पाहता ती आता ३९ वर्षांची झाली आहे यावर कोणीच विश्वास ठेवणार नाही.

सध्या प्रिया तिच्या पती आणि अभिनेता उमेश कामतसह 'बिन लग्नाची गोष्ट' या चित्रपटामुळे चर्चेत आहे. १२ सप्टेंबर रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळतो आहे.

Click Here