माझं रूप लय भारी, न्हाई हटतं कुणाच्या नजरा!

प्रार्थना बेहरेचं साडीत खुललं सौंदर्य!

प्रार्थना बेहरे मराठी कलाविश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिला कोणत्याही परिचयाची गरज नाही.

प्रार्थनाचं फॅन फॉलोव्हिंग खूप आहे. ती सोशल मीडियावर चांगलीच सक्रीय आहे आणि ती या माध्यमातून चाहत्यांना अपडेट देत असते. 

नुकतेच तिने काही फोटो शेअर केले आहेत, या फोटोंमध्ये ती मराठमोळ्या लूकमध्ये दिसते आहे. 

दसऱ्यासाठी तिनं हा खास लूक केला होता. तिच्या या लूकला चाहत्यांची पसंती मिळताना दिसते आहे.

फोटो शेअर करत तिनं कॅप्शनमध्ये लिहलं, "दसरा म्हणजे आनंद, उमेद आणि नव्या सुरुवातीचं प्रतीक… आपल्या जीवनातही नवा उत्साह नवी उमेद येवो. विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा!".

प्रार्थना बेहरेने मरुन रंगाची डिझाईनची साडी नेसली. 

कपाळावर चंद्रकोर, नाकात नथ अशा पारंपारिक साजमध्ये प्रार्थना खूपच सुंदर दिसते आहे.

एकापेक्षा एक पोझ देत तिनं चाहत्यांना घायाळ केलंय. तिचे हे फोटो चर्चेत आले आहेत.

Click Here