प्रार्थना बेहेरेच्या लाघवी स्मितहास्याची चाहत्यांना भुरळ
प्रार्थना बेहेरे ही मराठी फिल्म इंडस्ट्रीतील एक गुणवान आणि सुंदर अभिनेत्री
निरागस सौंदर्य आणि गोड स्मितहास्यामुळे प्रार्थना नेहमी चाहत्यांची लाडकी.
कॉफी आणि बरंच काही या चित्रपटातील तिची भूमिका साऱ्यांनाच पंसत पडली.
आता ती पुन्हा आपल्या अभिनयाची जादू दाखवण्यासाठी सज्ज झालीये.
प्रार्थनाने नुकताच ताजा फोटोशूट पोस्ट केलाय. त्यात ती ब्लॅक कॉफी पितेय.
सध्या फिटनेसच्या दृष्टीने ब्लॅक कॉफी हा तरूणाईच्या जीवनतला ट्रेंड झालाय.
हाच ट्रेंड फॉलो करत प्रार्थनाने हातात कॉफी मग घेत छान पोज दिल्या आहेत.
तिचे भुरळ पाडणारे लाघवी स्मितहास्य चाहत्यांच्या नक्कीच पसंतीस उतरतेय.