म्हणाली "फक्त गाल काही कमी होत नाहीत..."
प्राजक्ता माळी हा मराठी कलाविश्वातील लोकप्रिय चेहरा आहे. तिचा चाहता वर्ग मोठा आहे.
प्राजक्ता सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं.
नुकतंच प्राजक्तानं काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
या फोटोशूटमध्ये प्राजक्ताने पांढऱ्या व सोनेरी रंगाचा ऑफ-शोल्डर टॉप आणि गुलाबी स्कर्ट परिधान केला आहे.
हे फोटो शेअर करत तिनं वजन कमी केल्याचं सांगितलं.
प्राजक्ताने लिहिले, "जेव्हा तुमचे वजन कमी होते, तेव्हा ते नक्कीच मिरवा. आता ५४ किलो! फक्त गाल काही कमी होत नाहीत".
३६ वर्षीय प्राजक्ता अजूनही अविवाहित आहे. प्राजक्ताने अनेक मालिका आणि सिनेमांमध्येही काम केलं आहे.