आली माझ्या घरी ही दिवाळी...

प्राजक्ता माळीचा 'दिवाळी स्पेशल' खास लूक

महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळी म्हणजे घराघरात पोहोचलेला चेहरा.

यंदा दिवाळीनिमित्त प्राजक्ताने खास लूक केला असून त्याचे फोटोही सोशल मीडियावर शेअर केलेत.

प्राजक्ताने एक गुलाबी रंगाचा मॉडर्न लेहंगा चोली ड्रेस परिधान केला असून त्यावर छान नक्षीकाम केलंय.

प्राजक्ताची चोली ही हेवी एम्ब्रॉडरी केलेली असून त्यावर कलरफूल मिरर वर्कही केल्याचे दिसतेय.

तिचा लेहंगा हाय वेस्टेड स्कर्टसारखा असून तो सॅटिन सिल्कच्या फॅब्रिकने बनवलाय.

गुलाबी चोली आणि मजेंटा लेहंगा हा लूक पूर्ण करण्यासाठी तिने डार्क पिंक दुपट्टा अन् गोल्डन इअररिंग्ज घातल्यात.

दिवााळीनिमित्त प्राजक्ता माळीने केलेल्या या खास लूकला चाहत्यांची भरपूर पसंती मिळताना दिसतेय.

'हास्यजत्रे'तील शिवाली परबच्या मनमोहक अदा

Click Here