मराठी सिनेसृष्टीतील 'कलरफुल' अभिनेत्री म्हणजेच पूजा सावंत. पूजा केवळ तिच्या अभिनयासाठीच नाही, तर तिच्या जबरदस्त फिटनेससाठीही ओळखली जाते.
पूजा सावंत ही ३६ वर्षांची आहे. ती आजही अत्यंत फिट आणि ग्लॅमरस दिसते.
फिटनेस फ्रिक पूजा सावंतची दैनंदिन दिनचर्या कशी आहे, ते जाणून घेऊयात.
पूजाचं सौंदर्य आणि फिटनेस टिकवून ठेवण्यामागे तिची कडक दिनचर्या आहे, ज्याचा खुलासा तिने नुकतंच 'लोकमत फिल्मी'ला दिलेल्या मुलाखतीत केला.
पूजा सकाळी ५ वाजता उठते. व्यायाम हा सूर्योदयापूर्वी व्हायला हवा असं तिचं मत आहे.
ग्लॅमर जगतात राहूनही पूजा एक शिस्तबद्ध आयुष्य जगते. तिने सांगितले की, तिला रात्री उशिरापर्यंत जागणे किंवा पार्ट्यांमध्ये जाणे अजिबात आवडत नाही. ती दररोज रात्री १० वाजता झोपते.
केवळ व्यायामच नाही, तर आहारावरही पूजाचं विशेष लक्ष असतं. ज्या दिवशी तिला व्यायामासाठी वेळ मिळत नाही, त्या दिवशी ती शरीराचे संतुलन राखण्यासाठी 'इंटरमिटंट फास्टिंग'चा आधार घेते.