निक्की तांबोळीच्या 'रॉयल' लूकने चाहत्यांच्या काळजाचा ठोका चुकला
'बिग बॉस' फेम अभिनेत्री निक्की तांबोळी तिच्या बोल्ड फॅशन सेन्समुळे नेहमीच चर्चेत असते.
ती कायम तिच्या लूक आणि स्टाइलमुळे दररोज सर्वांचे लक्ष वेधून घेत असते.
नुकतेच निक्कीने तिचे काही फोटो इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत.
यामध्ये निक्की बोल्ड अँड ब्युटीफुल दिसत आहे.
निक्कीने क्रीम रंगाचा 'बॉडी-हगिंग' गाऊन परिधान केला होता.
या गाऊनवर नाजूक एम्ब्रॉयडरी करण्यात आली होती, ज्यामुळे तिला एक वेगळाच 'क्लासी' लूक मिळाला.
संपूर्ण गाऊनवर हिऱ्यांचे हाताने केलेले भरतकाम होते. तर या गाऊनला मागच्या बाजूला एक लांब ट्रेल होता.
निक्कीने या लूकवर लाल रंगाची लिपस्टिक लावून सौंदर्यात भर घातली होती.
अभिनेत्रीने लाइट मेकअप आणि मोकळे केस ठेऊन तिचा लुक पूर्ण केला आहे.
निक्कीच्या या फोटोंवर चाहत्यांनी कमेंट्सचा पाऊस पाडला आहे.