चांद तू नभातला...!


आज २२ सप्टेंबरपासून शारदीय नवरात्रोत्सवाला सुरूवात होत आहे.

देवीची आराधना, गरबा, दांडिया याशिवाय नवरात्रीमध्ये आणखी उत्साह वाढविणारी एक गोष्ट असते ती म्हणजे नवरात्रीचे रंग.

आजच्या पहिल्या दिवशी शांतता आणि समृद्धी यांचे प्रतीक असलेला पांढऱ्या रंगाचे कपडे परिधान केले जात आहेत.

नवरात्रोत्सवानिमित्त अनेक अभिनेत्रींनी विविध लूकमधील फोटो शेअर केले आहेत.

अशातच 'आई कुठे काय करते' फेम अभिनेत्री मधुराणी प्रभुलकरने शेअर केलेले फोटो सोशल मीडियावर चर्चेत आहेत.

पांढऱ्या रंगाची इरकल साडी परिधान करुन अभिनेत्रीने  साजशृंगार केला आहे. 

मधुराणी या फोटोंमध्ये अतिशय सुंदर दिसते आहे. तिच्या फोटोंनी चाहत्यांचं लक्ष वेधलं आहे.

अभिनेत्रीच्या या लेटेस्ट फोटोंवर चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.


चेहरा है या चाँद खिला है...!

Click Here