एवढी ग्लॅमरस 'नागिन' कधी पाहिलीये का?

'बिग बॉस हिंदी' फेम अभिनेत्री प्रियांका चहर चौधरी 'नागिन'च्या भूमिकेत दिसणार आहे. 

एकता कपूरची गाजलेली मालिका 'नागिन'चा सातवा सीझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. 

यामध्ये 'बिग बॉस हिंदी' फेम अभिनेत्री प्रियांका चहर चौधरी 'नागिन'च्या भूमिकेत दिसणार आहे. 

प्रियांकाने नुकतेच तिचे काही ग्लॅमरस फोटो इन्स्टाग्रामवरुन शेअर केले आहेत. 

यामध्ये तिने हटके लूक केल्याचं दिसत आहे. प्रियांकाने पांढऱ्या रंगाचा ड्रेस परिधान केला आहे. 

फिल्मफेअर ओटीटी २०२५ अवॉर्डसाठी प्रियांकाने हा खास लूक केला होता. 

नव्या नागिनचा हा ग्लॅमरस अवतार पाहून चाहतेही थक्क झाले आहेत. 

२७ डिसेंबरपासून 'नागिन ७' प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 

Click Here