'मुरांबा' ही स्टार प्रवाहवरील लोकप्रिय मालिका आहे. या मालिकेत रेवा हे पात्र साकारून अभिनेत्री निशाणी बोरुले घराघरात पोहोचली.
या मालिकेने निशाणीला लोकप्रियता मिळवून दिली होती. पण अचानक मालिकेतून तिने एक्झिट घेतली.
त्यानंतर मात्र ती कुठेच दिसली नाही. निशाणी सोशल मीडियावर सक्रिय असल्याचं दिसतं.
अनेक अपडेट्स ती चाहत्यांना देत असते. तसंच ती अनेकदा फोटोही शेअर करते.
निशाणीने नुकतंच नव्या फोटोशूटचे फोटो शेअर केले आहेत. यामध्ये तिने शॉर्ट स्कर्ट आणि शर्ट परिधान केलं आहे.
तिचं हे क्लासी फोटोशूट चाहत्यांच्याही पसंतीस उतरल्याचं दिसत आहे.