पाहा अभिनेत्रीचं खास फोटोशूट
बॉलिवूड आणि दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनयाने आणि सौंदर्याने भुरळ घालणारी अभिनेत्री म्हणजे मृणाल ठाकूर.
मृणाल ठाकूर सध्या तिच्या नवीन फोटोशूटमुळे चर्चेत आली आहे.
सोशल मीडियावर सक्रिय असलेल्या मृणालने नुकतेच साडीतील काही सुंदर फोटो शेअर केले आहेत.
मृणालने या फोटोशूटसाठी एक अतिशय मोहक आणि पारंपारिक साडी निवडली आहे.
या फोटोंमध्ये तिची साधी पण प्रभावी स्टाईल उठून दिसत आहे.
मृणालने हे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर करताच चाहत्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे.
कपाळावर छोटी टिकली, मोकळे केस आणि कानातले झुमके यांमुळे तिचा हा लूक अधिकच खुलून दिसत आहे.
केवळ ग्लॅमरस वेस्टर्न आऊटफिटच नाही, तर पारंपारिक भारतीय पोषाख मृणाल किती नजाकतीने कॅरी करू शकते, हे या फोटोशूटवरून पुन्हा एकदा दिसून आलं.