अभिनेत्री मृणाल ठाकुर हिंदी, साउथ सिनेमांमध्ये दिसत असली तरी ती मराठी कुटुंबातली आहे
धुळ्यातील मराठी कुटुंबात मृणालचा जन्म झाला
त्यामुळे मृणाल चांगलं मराठी बोलते
तिने २०१४ साली 'विटी दांडू' आणि 'सुराज्य' या मराठी सिनेमांमध्ये काम केलं होतं
मृणालने पहिला मराठी सिनेमा कोणता पाहिला होता याचा किस्सा एका मुलाखतीत सांगितला
लहानपणी टीव्हीवर शनिवार-रविवार मराठी सिनेमे लागायचे. त्यात तिने 'झपाटलेला' सिनेमाचं नावं घेतलं
त्यातल्या 'ओम फट स्वाहा' हा डायलॉगही तिच्या आवडीचा आहे.
शाळेत ते एकमेकांना 'ओम फट स्वाहा'म्हणत घाबरवायचे असाही किस्सा तिने सांगितला.