दाक्षिणात्य लूकमधील फोटो व्हायरल
अभिनेत्री मृणाल ठाकूर हिने आपल्या साध्या आणि तितक्याच मोहक सौंदर्याने प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केले आहे.
मृणाल सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते आणि नवनवीन फोटोशूट शेअर करत असते.
नुकताच तिने तिचा एक नवीन दाक्षिणात्य लूक शेअर केला असून, तिचे हे फोटो इंटरनेटवर तुफान व्हायरल होत आहेत.
मृणालने अबोली रंगाचा पट्टू पावडाई हा दक्षिण भारतीय संस्कृतीतील पारंपारिक पोषाख परिधान केला आहे.
कपाळावर छोटी टिकली आणि डोळ्यांत गडद काजळ यामुळे तिचा लूक अधिकच सुंदर दिसत आहे.
यावर तिने परिधान केलेल्या दाक्षिणात्य दागिन्यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.
केसात माळलेला गजरा तिच्या सौंदर्याला अधिकच उठाव देत आहे.
मृणालने जेव्हापासून दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवले आहे, तेव्हापासून तिला पारंपारिक लूकमध्ये पाहणे प्रेक्षकांना खूप आवडते.