मौनी रॉयचं हॉट फोटोशूट
बॉलिवूडची 'नागिन' अर्थात अभिनेत्री मौनी रॉय आपल्या अभिनयासोबतच ग्लॅमरस फॅशन सेन्ससाठी ओळखली जाते.
नुकतेच मौनीने सोशल मीडियावर तिच्या लेटेस्ट फोटोशूटचे काही फोटो शेअर केले आहेत.
यावेळी मौनी चक्क 'टायगर-प्रिंट' स्ट्रॅपलेस सिलहूट ड्रेसमध्ये दिसत असून तिची ही स्टाईल प्रचंड चर्चेत आहे.
तिने आपला हा लूक मिनिमल ज्वेलरी आणि न्यूड मेकअपसह पूर्ण केला आहे.
मौनीने हे फोटो इंस्टाग्रामवर पोस्ट करताच चाहत्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे.
मौनी रॉयने 'क्यूंकी सास भी कभी बहू थी' मधून टीव्हीवर पदार्पण केले होते.
त्यानंतर केलेल्या 'नागिन' मालिकेमुळे ती घराघरात पोहोचली.
तिने 'गोल्ड' आणि 'ब्रह्मास्त्र' सारख्या हिंदी चित्रपटांत काम केले आहे.