मिथिला पालकरचा मराठमोळा लूक
मिथिला पालकरच्या निरागस सौंदर्यावर सगळेच फिदा आहेत
केशरी रंगाच्या सुंदर सिल्क साडीत तिचं सौंदर्य आणखी खुललं आहे
साडीला हिरवी बॉर्डर आहे त्यावर तिने सोनेरी काठ असलेला हिरवा ब्लाऊज घातला आहे
मिथिलाने सुंदर सोन्याचा हार आणि कानातले परिधान केले आहेत
या लूकमध्ये तिने छान पोज देत फोटोशूट केलं आहे. हातावर छोटीशी मेहंदीही काढली आहे
ही साडी मिथिलाच्या आईची आहे. मैत्रिणीच्या लग्नात आईची साडी नेसण्याचा आनंद काही औरच असं तिने कॅप्शन लिहिलं आहे
मिथिलाचा हा मराठमोळा पारंपरिक लूक प्रेमात पाडणारा आहे