मनिका विश्वकर्माने 'मिस युनिव्हर्स इंडिया २०२५'चा यंदाचा खिताब नावावर केला.
राजस्थानची लेक यंदाची 'मिस युनिव्हर्स इंडिया'ची विजेती ठरली आहे.
मनिका विश्वकर्मा ही राजस्थानच्या गंगानगर येथील आहे.
सध्या ती दिल्लीत पॉलिटिकल सायन्स आणि इकोनॉमिक्सचं शिक्षण घेत आहे.
यासोबतच ती मॉडेलिंगही करत होती. ती एक क्लासिकल डान्सरही आहे.
तिने मिस युनिव्हर्स राजस्थान २०२४चा खिताब जिंकला होता.
मनिका 'मिस युनिव्हर्स २०२५'मध्ये भारताचं प्रतिनिधित्व करणार आहे.