अबोली मालिकेतील अभिनेत्रीचं सुंदर फोटोशूट
'सहकुटुंब सहपरिवार' या मालिकेमुळे अभिनेत्री कोमल कुंभार नावारुपाला आली.
या लोकप्रिय मालिकेत तिने अंजली नावाचं पात्र साकारलं होतं. तिच्या या पात्राला प्रेक्षकांनी अक्षरश: डोक्यावर घेतलं.
सध्या कोमल स्टार प्रवाह वरील 'अबोली' मलिकेत काम करताना दिसते आहे.
डिझायनर गुलाबी ब्लाऊज, त्यावर काचेचं वर्क, पिवळी साडी या लूकमध्ये ती सुंदर दिसत आहे
गळ्यात भरजरी हार, केसात गजरा माळत तिने लूक पूर्ण केला आहे
पदर उडवत तिने एकापेक्षा एक पोज दिल्या आहेत
कोमलने आपल्या निरागस लूकमधून चाहत्यांना प्रेमातच पाडलं आहे