निशाणी बोरुले ही मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहे.
स्टार प्रवाहवरील 'मुरांबा' मालिकेतून ती प्रसिद्धीझोतात आली.
या मालिकेत तिने साकारलेल्या खलनायिकेच्या पात्राला प्रेक्षकांची पसंती मिळाली.
निशाणी सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असल्याची पाहायला मिळते.
निशाणी कायमच तिचे बोल्ड फोटो आणि व्हिडीओंमुळे चर्चेत असते. तिचा चाहतावर्गही प्रचंड मोठा आहे.
नुकतंच अभिनेत्रीने पिवळ्या रंगाची साडी नेसून त्यावर एकापेक्षा एक पोझ देत हटके फोटोशूट केलंय.
निसर्गाच्या सानिध्यात तिने हे फोटोशूट केलं आहे.तिचं हे फोटोशूट सध्या नेटकऱ्यांमध्ये चर्चेत आलं आहे.