मराठी मालिकाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक नाव म्हणजे योगिता चव्हाण.
'जीव माझा गुंतला' या मालिकेमुळे ती घराघरात पोहोचली.
योगिता तिच्या अभिनयासह डान्समुळे देखील चाहत्यांमध्ये तितकीच प्रसिद्ध आहे.
सोशल मीडियावर वेगवेगळे डान्स व्हिडीओ, फोटो शेअर करत ती चाहत्यांच्या संपर्कात राहते.
या फोटोंमध्ये योगिताने पिवळ्या रंगाची साडी परिधान करुन एकापेक्षा एक पोज दिल्या आहेत.
अभिनेत्रीच्या या फोटोंमधील अदा पाहून नेटकरी घायाळ झाले आहेत.