पूजा बिरारी ही मराठी टीव्ही इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे.
'स्वाभिमान- शोध अस्तित्वाचा' या मालिकेने खऱ्या अर्थाने तिला ओळख मिळवून दिली.
पूजा सध्या स्टार प्रवाहवरील 'येड लागलं प्रेमाचं' मालिकेत मंजिरी या मुख्य भूमिकेत दिसत आहे.
पूजा सोशल मीडियावर चांगलीच सक्रीय आहे. त्याद्वारे ती कायम तिचे ग्लॅमरस फोटो, व्हिडीओ शेअर करते.
अशातच सध्या इन्स्टाग्रामवर पूजाच्या नव्या व्हिडीओची जोरदार चर्चा सुरु आहे.
या व्हिडीओमध्ये पूजाने पिवळ्या रंगाचा ड्रेस परिधान केला आहे.
या लूकमध्ये अभिनेत्री कमालीची सुंदर दिसते आहे. तिच्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी प्रेमाचा वर्षाव केलाय.