तुझ्या रंगी सांज रंगली...!


वैष्णवी कल्याणकर ही मराठी मालिकाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहे. 

'देवमाणूस', 'तिकळी' यांसारख्या मालिकांमधून आपण तिला अभिनय करताना पाहिलंय.

अलिकडेच ती स्टार प्रवाहच्या 'काजळमाया' या मालिकेत पाहायला मिळाली.

वैष्णवी तिच्या अभिनयासह सोशल मीडियावर देखील तितकीच चर्चेत असते. 

वैष्णवी नेहमी सोशल मीडियामार्फत तिच्या कामासंबंधित अपडेट तसेच खासगी आयुष्यातील गोष्टी चाहत्यांसोबत शेअर करत असते.

 अशातच अभिनेत्रीनं नुकतंच एक पारंपरिक अंदाजात खास फोटोशूट केलं आहे.

जांभळ्या रंगाची साडी  अन् त्यावर साजशृंगार करत तिने आपला लूक पूर्ण केला आहे. तिच्या या फोटोंनी चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलंय.

वैष्णवी या पारंपरिक लूकमध्ये अतिशय सुंदर दिसते आहे. तिचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. 

उफ्फ, तेरी अदा...!

Click Here