शर्वरी जोगची पहिली मालिका कोणती?

मराठी टेलिव्हिजनवरील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक नाव म्हणजे शर्वरी जोग. 

शर्वरी जोग ही मूळची कोल्हापूरची आहे. शाळेत असल्यापासूनच शर्वरी बालनाट्यातून काम करत होती. 

तिच्या वडिलांचा नाट्य क्षेत्राशी जवळचा संबंध होता. त्यामुळे तिला अभिनयाची आवड सुरुवातीपासूनच होती. 

मालिका क्षेत्रात येण्यापूर्वी शर्वरीने प्रायोगिक नाटक आणि व्यावसायिक नाटकांमधून काम केलं आहे.

बीएससीची पदवी मिळवलेल्या शर्वरीला पेंटिंगची आवड होती त्यासाठी तिने 'फाईन आर्टस् 'चं शिक्षण घेतलं आहे. 

'जीव झाला वेडा पिसा' या मालिकेतून तिने इंडस्ट्रीत पाऊल ठेवलं.या मालिकेतील  सोनी नावाच्या भूमिकेने शर्वरीला खूप प्रसिद्धी मिळवून दिली. 

त्यानंतर ती 'जाऊ नको दूर…बाबा' तसेच 'कुन्या राजाची गं तू राणी' या मालिकांमध्ये झळकली. 

सध्या शर्वरी स्टार प्रवाह वाहिनीवरील 'तू ही रे माझा मितवा' मालिकेत मुख्य भूमिका साकारते आहे. 

तुझ्या रंगी सांज रंगली...!

Click Here