अभिनेत्री शर्वरी जोग ही मराठी मालिकाविश्वातील लोकप्रिय नायिका आहे.
‘तू ही रे माझा मितवा’ या मालिकेतून ती घराघरात पोहोचली आहे.
या मालिकेत ती साकारत असलेली ईश्वरीची भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे.
मालिकेतील तिच्या या कामाचं सगळीकडेच कौतुक होताना दिसतंय.
नुकतेच शर्वरीने इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या तिच्या मोहक फोटोंनी चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
काळ्या रंगाचा डिझायनर गाऊनमध्ये अभिनेत्री अतिशय एलिगंट आणि ग्रेसफुल दिसत आहे.
अलिकडेच पार पडलेल्या 'स्टार प्रवाह परिवार पुरस्कार सोहळा २०२६' सोहळ्याठी तिने हा लूक केला होता.