देसाईंच्या नम्रताची बातच न्यारी, फोटोंवरुन नजर हटेना 

मधुरा जोशी ही मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहे. 

'फुलाला  सुगंध मातीचा' मालिकेतून ही नायिका महाराष्ट्रातील घराघरात पोहोचली.

सध्या मधुरा स्टार प्रवाहवरील 'तू ही रे माझा मितवा' मालिकेत काम करताना दिसते आहे. 

या मालिकेत तिने साकारलेली नम्रता देसाई प्रेक्षकांना भावली आहे. 

मधुरा तिच्या अभिनयासह फॅशनसेन्समुळे देखील चर्चेत असते. 

नुकतंच तिने निळ्या रंगाच्या साडीत नवरात्रीनिमित्त सुंदर फोटोशूट केलं आहे. 

या लूकवर साजेसा सोन्याच्या आणि मोत्यांच्या दागिन्यांचा साज तिने केला आहे. 

अभिनेत्रीच्या या सुंदर फोटोंनी चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. मधुराचं हे नवं फोटोशूट नेटकऱ्यांना आवडलं आहे.


चांद तू नभातला...! 

Click Here