तुझ्या रंगी सांज रंगली...!

'ठरलं तर मग' या मालिकेतून अभिनेत्री प्रियांका तेंडोलकर हे नाव घराघरात पोहोचलं.

'ठरलं तर मग' मालिकेत खलनायिकेची भूमिका साकारुन तिने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं आहे.

या मालिकेव्यतिरिक्त प्रियांकाने 'फुलपाखरू', 'साथ दे तू मला' यांसारख्या गाजलेल्या मालिकांमध्ये देखील काम केलं आहे. 

प्रियांका तिच्या अभिनयासह फॅशन सेन्समुळे देखील चाहत्यांचं लक्ष वेधून घेते. 

नुकतेच अभिनेत्रीने इन्स्टाग्रामवर तिचे खास फोटो शेअर केले आहेत.

अबोली रंगाच्या साडीमध्ये प्रियांकाचं सौंदर्य आणखी खुलून दिसतंय.

प्रियांका या फोटोंमध्ये अतिशय सुंदर दिसत आहे. तिच्या फोटोंना चाहत्यांची पसंती मिळते आहे.

सुंदरा, स्वॅग तुझा लय जबरा...!

Click Here