अभिनेत्री तन्वी मुंडले मराठी टेलिव्हिजनवरील लोकप्रिय अभिनेत्री आहे.
'भाग्य दिले तू मला' मालिकेतून ती घराघरात पोहोचली आहे.
या मालिकेनं प्रेक्षकांचा निरोप घेतला असला तरी प्रेक्षकांच्या मनातील राज-कावेरीचं स्थान कायम आहे.
तन्वीने या मालिकेत कावेरीची भूमिका साकारली होती.
छोट्या पडद्यावरील ही लोकप्रिय अभिनेत्री सध्या चर्चेत आहे.नुकतंच तन्वी मुंडलेनं सुंदर फोटोशूट केलं आहे.
या फोटोंमध्ये तन्वी खूपच सुंदर दिसते आहे. यात तिने हिरव्या रंगाची पैठणी परिधान केली आहे.
तन्वी मुंडलेच्या या फोटोशूटला चाहत्यांची पसंती मिळताना दिसत आहे.