अभिनेत्री श्वेता खरात या नावाला कोणत्याही परिचयाची गरज नाही.
‘मन झालं बाजिंद’ या मालिकेतून अभिनेत्री श्वेता खरात प्रसिद्धीझोतात आली.
अलिकडेच श्वेता पारु मालिकेत झळकली. या मालिकेत तिने अनुष्का नावाचं पात्र साकारलं होतं.
नुकतेच श्वेताने सोशल मीडियावर तिचे नवे फोटो शेअर केले आहेत. त्यामुळे ती चर्चेत आली आहे.
या फोटोंमध्ये अभिनेत्रीने गुलाबी रंगाची नऊवारी साडी परिधान केली आहे.
तिने परिधान केलेल्या या साडीवरील डिझाइनर ब्लाऊज सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे.
श्वेताचे हे पारंपरिक अंदाजातील फोटो अनेकांच्या पसंतीस उतरत आहेत.