शिवानी मुंढेकर ही मराठी मालिकाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहे.
आपल्या सहज सुंदर अभिनयाने तिने प्रेक्षकांची मनं जिंकली.
‘मुरांबा’ मालिकेतून घराघरात पोहोचलेली ही अभिनेत्री सध्या तिच्या खास फोटोशूटमुळे चर्चेत आली आहे.
नुकतेच शिवानीने तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर तिचे काही फोटो शेअर केले आहेत.
गुलाबी रंगाच्या ड्रेसमध्ये हटके पोज देत अभिनेत्रीने हे फोटोशूट केलं आहे.
या फोटोंमधील अभिनेत्रीचा मनमोहक अंदाज पाहून नेटकरी सुद्धा घायाळ झाले आहेत.
"धडकन जैसे दिल की...", असं कॅप्शन तिने या फोटोंना दिलं आहे.