वय हा फक्त आकडा आहे हे काही अभिनेत्रींकडे पाहून जाणवतं.
बॉलिवूडसह मराठी इंडस्ट्रीत अशा अनेक अभिनेत्री आहेत, त्या स्वत:ला कशा मेंटेन ठेवतात हे त्यांच्या चाहत्यांना जाणून घ्यायला नेहमीच आवडतं. अशीच एक अभिनेत्री म्हणजे वीणा जगताप.
वीणा जगताप ही मराठी मालिकाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे.
आपल्या अभिनयासह सौंदर्याने तिने चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे.
सध्या वीणा जगताप झी मराठीवरील 'सावळ्याची जणू सावली' मालिकेत ऐश्वर्या मेहेंदळे नावाचं पात्र साकारते आहे.
वीणाचा जन्म ४ मार्च १९९४ मध्ये मुंबईतील उल्हासनगर येथे झाला. ती सध्या ३१ वर्षांची आहे.
'राधा प्रेम रंगी रंगली' या मालिकेच्या माध्यमातून इंडस्ट्रीत पदार्पण केलं.अगदी कमी काळातच ती प्रेक्षकांची लाडकी अभिनेत्री बनली.
तसंच वीणाने ‘बिग बॉस मराठी’च्या दुसऱ्या पर्वात सहभाग घेतला होता.