समृद्धी केळकर हा मराठी मालिकाविश्वातील लोकप्रिय चेहरा आहे.
सहज सुंदर अभिनय आणि निखळ सौंदर्याच्या जोरावर तिने भलामोठा चाहतावर्ग निर्माण केला आहे.
समृद्धीने अनेक मालिकांमध्ये काम केलं आहे.
मात्र, तिला 'फुलाला सुगंध मातीचा' या मालिकेने खरी ओळख मिळवून दिली.
सध्या ती 'हळद रुसली कुंकू हसलं' मालिकेत कृष्णा नावाच्या मुख्य भूमिकेत पाहायला मिळतेय.
तुम्हाला माहितीये का? प्रेक्षकांच्या लाडक्या असणार्या अभिनेत्रीचं रायगड जिल्ह्याशी खास कनेक्शन आहे.
समृद्धी मुळची दिवेआगरची आहे. अलिकडेच सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत तिने आपल्या गावाबद्दल माहिती दिली होती.