रुपाली भोसले ही मराठी मालिकाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहे.
'आई कुठे काय करते' या मालिकेतून ती घराघरात पोहोचली.
या मालिकेत तिचं संजना हे नकारात्मक पात्र असूनही अनेकांच्या ते पसंतीस उतरलं.
रुपाली भोसले आता 'लपंडाव' या मालिकेच्या माध्यमातून प्रेक्षकांचं मनोरंजन करते आहे.
आपल्या अभिनयाने चर्चेत असणारी ही नायिका सोशल मीडियावरही तितकीच सक्रीय असते.
नुकतंच रुपालीने मकर संक्रांती निमित्ताने सुंदर फोटोशूट केलं आहे.
काळ्या रंगाची नऊवारी साडी त्यावर साजेसे दागिने परिधान करून तिने साजशृंगार केला आहे.
रुपाली या फोटोंमध्ये कमालीची सुंदर दिसते आहे.तिच्या या फोटोंवर चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.