मराठीसह हिंदी मालिकाविश्वात आपल्या सहज सुंदर अभिनयानं प्रेक्षकांची मनं जिंकणारी अभिनेत्री म्हणजे रुपाली भोसले.
रुपालीने आजवर वेगवेगळ्या मालिकांमधून आपलं अभिनय कौशल्य दाखवलं आहे. मात्र, तिला 'आई कुठे काय करते' या मालिकेमुळे खरी ओळख मिळाली.
या मालिकेत तिने साकारलेल्या संजना नावाच्या पात्रानं अनेकांचं लक्ष वेधून घेतलं.
सध्या रुपाली 'लपंडाव' या मालिकेत पाहायला मिळते आहे.
दरम्यान, नुकतेच सोशल मीडियावर अभिनेत्रीने तिचे खास अंदाजातील फोटो शेअर केले आहेत.
जांभळ्या रंगाची पैठणी साडी, नाकात नथ आणि केसांत गजरा माळून अभिनेत्री नटली आहे.
रुपाली या पारंपरिक लूकमध्ये फारच देखणी दिसते आहे. तिच्या लूकवर चाहते भाळले आहेत.