रुचिरा जाधव हा मराठी मालिकाविश्वातील लोकप्रिय चेहरा आहे.
आजवर तिने अनेक गाजलेल्या मालिकांमध्ये काम केलं आहे.
सध्या रुचिरा जाधव 'तू ही रे माझा मितवा' मालिकेत लावण्या नावाची भूमिका साकारते आहे.
रुचिरा सोशल मीडियावर कायम सक्रिय असल्याची पाहायला मिळते.
आपल्या अभिनयासह रुचिरा अनेकदा तिच्या फॅशनसेन्समुळे चर्चेत येते.
नुकतेच रुचिराने इन्स्टाग्रामवर तिचे साडीतील लेटेस्ट फोटो शेअर केले आहेत.
पिवळ्या रंगाच्या साडीतील तिच्या साध्या पण आकर्षक लूकने तिने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.