छोट्या पडद्यावरची लाडकी सून म्हणून अभिनेत्री रेश्मा शिंदेला ओळखलं जातं.
रेश्माने आजवर अनेक गाजलेल्या मालिकांमध्ये महत्वाच्या भूमिका साकारुन चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवलं.
सध्या ही अभिनेत्री स्टार प्रवाहवरील 'घरोघरी मातीच्या चुली' मालिकेत मुख्य भूमिका साकारते आहे.
या मालिकेत ती साकारत असलेलं जानकी नावाचं पात्र प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलं आहे.
उत्तम अभिनय आणि निरागस चेहरा यामुळे लोकांच्या मनावर राज्य करणारी रेश्मा सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत आहे.
नुकतंच रेश्माने नवरात्रीनिमित्त खास फोटोशूट केलं आहे. हे फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
केशरी रंगाची साडी त्याला साजेसा ब्लाऊज परिधान करुन तिने हे फोटोशूट केलं आहे.
रेश्माचे हे फोटो तिच्या चाहत्यांना खूप आवडले आहेत.