तुझं रूप हे नक्षत्राचं…!

'आई कुठे काय करते' या लोकप्रिय मालिकेतून घराघरांत पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे मधुराणी प्रभुलकर. 

या मालिकेतील तिची अरुंधती ही भूमिका चांगलीच गाजली. 

आता मधुराणी 'मी सावित्रीबाई ज्योतीराव फुले'या नव्या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येते आहे.

ही मालिका स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या, पहिल्या महिला शिक्षिका क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारित आहे.

या मालिकेत मधुराणी सावित्रीबाईंच्या भूमिकेत दिसणार आहे.

यानिमित्ताने मधुराणीने केलेलं पारंपरिक फोटोशूट चर्चेत आहे. तिच्या या फोटोंनी चाहत्यांचं लक्ष वेधलं आहे.

लाल पैठणी, नाकात नथ आणि त्यावर साजेसा शृंगार करत ती नटली आहे. मधुराणी या फोटोंमध्ये फारच अप्रतिम दिसते आहे.


साध्या 'अबोली'चा ग्लॅमरस अंदाज, फोटो चर्चेत

Click Here