मानसी कुलकर्णी ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री आहे.
सध्या ही अभिनेत्री 'थोडं तुझं आणि थोडं माझं' मालिकेतून प्रेक्षकांचं मनोरंजन करते आहे.
या मालिकेत तिने गायत्री प्रभू नावाचं पात्रं साकारलं आहे.
खलनायिकेच्या भूमिकेतूनही अभिनेत्री प्रेक्षकांची मनं जिंकण्यात यशस्वी ठरली आहे.
आता अभिनेत्री तिच्या अभिनयामुळे नाहीतर लेटेस्ट फोटोशूटमुळे चर्चेत आली आहे.
नुकतंच अभिनेत्रीने गुलाबी रंगाची साडी नेसून खास फोटोशूट केलं आहे.
या फोटोंमधील अभिनेत्रीचा लूक पाहून चाहते देखील घायाळ झाले आहेत.