अभिनेत्री शर्वरी कुलकर्णी ही मराठी मालिकाविश्वातील लोकप्रिय नायिका आहे.
'मन उडू उडू झालं' या मालिकेतून ती महाराष्टातील घराघरात पोहोचली.
शर्वरी ही लोकप्रिय मराठी अभिनेत्री संपदा जोगळेकर यांची मुलगी आहे.
सध्या ही अभिनेत्री एका फोटोशूटमुळे चर्चेत आली आहे.
शर्वरीने नुकतेच तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर खास असे फोटो शेअर केले आहेत.
गुलाबी रंगाची सिल्क साडी, नाकात नथ अशा पारंपरिक लूकमधील तिचे फोटो लक्ष वेधून घेत आहेत.
शर्वरी या लूकमध्ये कमालीची सुंदर दिसते आहे. तिच्या फोटोंना नेटकऱ्यांची पसंती मिळताना दिसतेय.